GRAMIN SEARCH BANNER

संगमेश्वर : निवेबुद्रुकमध्ये 30 वर्षीय तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न; एकाच वेळी घेतले गवत मारण्याचे औषध, फिनेल आणि गोळ्या

Gramin Varta
344 Views

संगमेश्वर : तालुक्यातील निवेबुद्रुक परिसरात एका तरुणाने झोपेच्या गोळ्या तसेच विषारी पदार्थांचे सेवन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. लखन वसंत सुर्वे (30) असे या तरुणाचे नाव असून, त्याला गंभीर अवस्थेत जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 26 नोव्हेंबर रोजी लखन यांनी राहत्या घरातच झोपेच्या गोळ्यांचे अतिरिक्त सेवन केले. त्यानंतर गवत नष्ट करण्याचे रसायन आणि फिनेलही पिल्याने त्यांची प्रकृती अचानक ढासळली. परिस्थिती गंभीर होताच नातेवाईकांनी त्यांना तातडीने देवरुख ग्रामीण रुग्णालयात नेले.
तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर अधिक उपचारांसाठी त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले. सध्या अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरू असून वैद्यकीय पथक त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहे.

Total Visitor Counter

3388204
Share This Article