GRAMIN SEARCH BANNER

आंजर्ले–परळ एसटीला नारगोली घाटात अपघात; मोठा अनर्थ टळला

Gramin Varta
169 Views

मंडणगड : आंजर्ले येथून परळकडे जाणाऱ्या एसटी बसला बुधवारी मध्यरात्री सुमारे २.३० वाजण्याच्या सुमारास नारगोली घाटात अपघात झाला. घाटातील एका वळणावर बसचे ब्रेक अचानक निकामी झाल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि बस रस्ता सोडून खाली घसरत कलंडली. मात्र झाडे व वेलींमध्ये अडकल्याने मोठा अनर्थ टळला.

मंडणगड पोलीस ठाण्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, सदर एसटी बसमध्ये सुमारे आठ प्रवासी होते. अपघातात बस दरीत कोसळण्याऐवजी कडेला असलेल्या झाडांमध्ये अडकल्याने प्रवाशांचा जीव वाचला. या घटनेत काही प्रवाशांना किरकोळ दुखापती झाल्या असून त्यांना प्राथमिक उपचार देण्यात आले.

अपघाताची माहिती मिळताच पोलीस व संबंधित यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेमुळे काही काळ वाहतुकीत अडथळा निर्माण झाला होता. पुढील तपास मंडणगड पोलीस करत आहेत.

Total Visitor Counter

3209946
Share This Article