GRAMIN SEARCH BANNER

पुरोगामी विचार समाजापर्यंत पोहोचवण्याचा स्तुत्य उपक्रम : गटशिक्षणाधिकारी उत्तम भोसले

Gramin Varta
73 Views

तुषार पाचलकर / राजापूर : पुरोगामी ही केवळ संघटना नसून ती एक सशक्त विचारधारा आहे. दिनदर्शिकेसारख्या उपक्रमातून हा विचार समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न निश्चितच कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन गटशिक्षणाधिकारी उत्तम भोसले यांनी केले.

महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक समितीच्या दिनदर्शिका प्रकाशनाचा सोहळा राजापूर तालुक्यातील कै. स्वा. से. आबा नारकर सभागृह, पाचल येथे उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना भोसले यांनी समितीच्या कार्याचा विशेष उल्लेख केला.

ते म्हणाले की, गेली दोन ते अडीच दशके पुरोगामी शिक्षक समिती शिक्षकांच्या विविध प्रश्नांसाठी तसेच विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी सातत्याने भरीव कार्य करत आहे. या कार्याचे सकारात्मक परिणाम आज राजापूर तालुक्याच्या शैक्षणिक गुणवत्तेत दिसून येत असून तालुका आघाडीवर आहे. ८० ते ९० वर्षांचे सेवानिवृत्त शिक्षक आज सन्मानित होत आहेत, हे दृश्य प्रेरणादायी असून नव्या पिढीसाठी आदर्श ठरणारे आहे. अशा अनुभवी आणि ज्येष्ठ शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली काम करणारी पुरोगामी शिक्षक समिती भविष्यात तालुक्याबरोबरच संपूर्ण जिल्ह्यात आदर्श शिक्षक संघटना म्हणून नावारूपाला येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचे स्वागत प्रकाश पाध्ये यांनी केले. अध्यक्षस्थानी समितीचे जिल्हाध्यक्ष यशवंत पेढांबकर होते.

यावेळी व्यासपीठावर पाचल ग्रामपंचायतीचे सरपंच बाबालाल फरास, उपसरपंच आत्माराम सुतार, ग्रामपंचायत सदस्य संजय पाथरे व सिद्धार्थ जाधव, राज्य संघटक यशवंत पाडावे, जिल्हा सल्लागार सुरेश साळवी, शशिकांत सकपाळ, नितीन कोलते, विजय कलकुटकी, रामदास कदम, प्रदीप पवार, विनायक खानविलकर, शिंदे सर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

या प्रसंगी ज्येष्ठ सेवानिवृत्त शिक्षक सखाराम साळवी आणि रंगनाथ सप्रे यांचा शाल, श्रीफळ देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन सुरेश साळवी व विनायक खानविलकर यांनी केले.

Total Visitor Counter

3366905
Share This Article