GRAMIN SEARCH BANNER

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे द्वितीय वर्ष एम. बी. बी. एस परीक्षेत उतुंग यश

Gramin Varta
161 Views

रत्नागिरी:- महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिकतर्फे ऑगस्ट २०२५ महिन्यात घेण्यात आलेल्या द्वितीय वर्ष एम. बी. बी. एस परीक्षेमध्ये  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने उत्तुंग यश मिळविले आहे. या संस्थेचा निकाल महाराष्ट्रातील सर्व वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये सर्वात जास्त म्हणजेच १०० टक्के लागला आहे. सन २०२४ या वर्षी झालेल्या प्रथम वर्ष एम. बी. बी. एस परीक्षेमध्ये देखील महाविद्यालयाचा निकाल राज्यातील सर्व वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये सर्वात जास्त म्हणजेच ९९ टक्के इतका लागला होता. या यशाबद्दल पालकमंत्री डॉ. उदय सामंत व आमदार किरण सामंत यांनी अधिष्ठाता, डॉ. जयप्रकाश रामानंद तसेच सर्व अध्यापक व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा निकालातील क्रमवारी खालील प्रमाणे  शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, रत्नागिरी १०० टक्के,  राजीव गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, ठाणे ९८.९० टक्के, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अलिबाग – ९८ टक्के,  इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर – ९७.९६ टक्के,  शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नंदुरबार – ९६.९० टक्के,  शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, चंद्रपूर ९६ टक्के,  शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, परभणी – ९६ टक्के,   बी. जे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, पुणे – ९५.६० टक्के,   शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर – ९५ टक्के,   ग्रॅन्ट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मुंबई – ९४.४२ टक्के,   शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मिरज – ९४.४० टक्के,   शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अकोला – ९४.२० टक्के,   टोपीवाला नॅशनल शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मुंबई ९४.०७ टक्के,   लोकमान्य टिळक वैद्यकीय महाविद्यालय, मुंबई -९३.९३ टक्के,   विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, लातूर – ९३ टक्के,  . शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, धाराशिव – ९३ टक्के,   शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, कोल्हापूर- ९३ टक्के,  शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सिंधुदूर्ग ९३ टक्के,   शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नांदेड -९२ टक्के,   सेठ जी. एस. वैद्यकीय महाविद्यालय, मुंबई ९१.५३ टक्के,  शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, संभाजीनगर – ९१.५० टक्के,  डॉ. वैशंपायन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सोलापूर – ९१ टक्के,   शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, बारामती – ९० टक्के,  आर्म फोर्ससेस मेडिकल कॉलेज, पुणे -९० टक्के,   शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जळगाव – ९८.९० टक्के,   हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, मुंबई- ८९ टक्के,   शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, गोंदिया – ८८.६६ टक्के,   शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, धुळे -८८ टक्के,विशेष प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांची विषयवार संख्या- औषधशास्त्र ८, सुक्ष्मजीवशास्त्र ७ व विकृतीशास्त्र ५ अशी आहे.

Total Visitor Counter

3200200
Share This Article