GRAMIN SEARCH BANNER

गावखडी येथे दुचाकी अपघातात तरुणाचा मृत्यू; चालकावर गुन्हा

Gramin Varta
412 Views

रत्नागिरी : रत्नागिरी तालुक्यातील गावखडी येथे झालेल्या दुचाकी अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाल्याप्रकरणी दुचाकी चालकावर पूर्णगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा अपघात २६ जानेवारी २०२६ रोजी दुपारी सुमारे १२.४५ वाजण्याच्या सुमारास घडला होता.

या प्रकरणी संकल्प सुभाष संकपाळ (वय १९, रा. निगडी, ता. जत, जि. सांगली) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित चालकाचे नाव आहे. अपघातात सुजल संजय घोरपडे (वय २३, रा. उरण, जि. सांगली) याचा मृत्यू झाला.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सुजल घोरपडे हा आपल्या ताब्यातील एमएच-१० ईजे ४७७० क्रमांकाच्या दुचाकीवरून पूर्णगड ते नाटे रस्त्याने कशेळी बीचकडे जात होता. यावेळी संकल्प संकपाळ हा दुचाकीवर मागे बसलेला होता. गावखडी परिसरात दुचाकी घसरल्याने दोघांचा अपघात झाला. या अपघातात सुजल घोरपडे याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून, या घटनेचा पुढील तपास पूर्णगड पोलीस करत आहेत.

Total Visitor Counter

3379414
Share This Article