GRAMIN SEARCH BANNER

खेड तालुक्यात युवासेनेच्या विविध पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

Gramin Varta
61 Views

खेड (प्रतिनिधी) : शिवसेना प्रमुख नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शिवसेना नेते रामदास भाई कदम, राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम तसेच युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांच्या नेतृत्वाखाली आणि युवासेना तालुकाप्रमुख सुरज रेवणे यांच्या पुढाकाराने गुहागर विधानसभा मतदारसंघातील खेड तालुक्यात युवासेनेच्या विविध पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या.
या नियुक्त्यांमध्ये भोस्ते जिल्हा परिषद गट उपतालुकाप्रमुखपदी आदर्श आंब्रे यांची निवड करण्यात आली. शीव पंचायत समिती गण विभागप्रमुखपदी सौद रावल, भोस्ते पंचायत समिती गण विभागप्रमुखपदी प्रशांत चांदणे, धामणदेवी पंचायत समिती गण विभागप्रमुखपदी आदिल मिठागिरे, लोटे पंचायत समिती गण विभागप्रमुखपदी अजित कदम, पन्हाळजे पंचायत समिती गण विभागप्रमुखपदी इसा सुर्वे तर उपविभागप्रमुखपदी दीपक मानके यांची नियुक्ती करण्यात आली.

तसेच आंबडस पंचायत समिती गणातील कुंभवली गाव शाखाप्रमुखपदी पारस चव्हाण, कुरवळ जावळी शाखाप्रमुखपदी दीपेश सावंत, कुरवळ खेड शाखाप्रमुखपदी किरण सुतार, लोटे पंचायत समिती गणातील भेलसई गाव शाखाप्रमुखपदी अमित गोरीवले यांची निवड करण्यात आली. शीव पंचायत समिती गणातील अळसुरे येथे नादील इरफान, निलीक येथे आतिफ चौघुले, शीव येथे नजीब पालेकर तसेच आष्टी येथे रहेब मुकादम यांची शाखाप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली.

धामणदेवी पंचायत समिती गणातील कोतवली गाव शाखाप्रमुखपदी ओंकार मोरे, असगणी गाव शाखाप्रमुखपदी अय्युब आंबेडकर यांची निवड करण्यात आली. भोस्ते पंचायत समिती गणातील भोस्ते रहाटेवाडी शाखाप्रमुखपदी सुनील रहाटे, विराचिवाडी शाखाप्रमुखपदी निहार पाटील, कोंडीवली गाव शाखाप्रमुखपदी क्रिश शिंदे तर पन्हाळजे पंचायत समिती गणातील मुळगाव शाखाप्रमुखपदी मंदार सावरटकर यांची नियुक्ती करण्यात आली.

या नियुक्ती कार्यक्रमावेळी शिवसेना उपनेते संजराव कदम, जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण, तालुकाप्रमुख सचिन धाडवे, नगराध्यक्षा माधवी बुटाला, सभापती पालेकर मॅडम, उपसभापती सुनील मोरे, पंचायत समिती सदस्य निसार सुर्वे, महेंद्र भोसले, नगरसेवक मिनार चिखले, निकेतन पाटणे, गुहागर विधानसभा संपर्कप्रमुख बापुशेठ आंब्रे, संघटक चंद्रकांत चाळके, माजी उपसभापती जीवन आंब्रे, विभागप्रमुख योगेश आंब्रे, सुशांत कदम, युवासेना जिल्हाप्रमुख दर्शन महाजन, उपजिल्हाप्रमुख सचिन काते, युवासेना तालुकाप्रमुख सुरज रेवणे, मिलिंद काते, विधानसभा समन्वयक सागर आंब्रे, तालुका सचिव अमोल आंब्रे, विभागप्रमुख रघुनाथ सुर्वे, शाम शिंदे यांच्यासह शिवसेना व युवासेनेचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

Total Visitor Counter

3410107
Share This Article