GRAMIN SEARCH BANNER

सह्याद्रि स्कूल ऑफ आर्ट सावर्डेच्या विद्यार्थ्यांचे उच्चकला परीक्षेत अभिनंदनीय यश

Gramin Search
27 Views

संगमेश्वर:- कला संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई व कला शिक्षण मंडळ मुंबई यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या शासकीय उच्चकला परीक्षेचा निकाल लागला आहे. या परीक्षेत विद्यार्थ्यांनी उज्वल यश प्राप्त केले आहे.

या परीक्षेत कलामहाविद्यालयालयीन स्थरावर मूलभूत अभ्यासक्रम या विभागातील ज्योती पांचाळ -प्रथम,आदित्य सावरटकर व मिथिल अंगचेकर -द्वितीय, कुमारी. मुक्ती गडदे -तृतीय
कलाशिक्षक पदविका विभाग – सोनल घाणेकर -प्रथम, तन्वी गोरीवले -द्वितीय, श्रावणी कुळे -तृतीय
रेखा व रंगकला विभाग इंटरमिजीएट – सौरभ साठे -प्रथम, सिद्धार्थ भोवड -द्वितीय,चिन्मय वडपकर-तृतीय, रेखा व रंगकला विभाग डिप्लोमा – सुजल निवाते -प्रथम, तुळशी भुवड -द्वितीय,साक्षी रेवणे -तृतीय

यशस्वी विद्यार्थ्यांचे सह्याद्रि शिक्षण संस्थेचे कार्यध्यक्ष व संगमेश्वर -चिपळूण मतदार संघांचे आमदार शेखर निकम, संस्थेचे सेक्रेटरी महेश महाडिक, जेष्ठ चित्रकार शिल्पकार प्रकाश अर्जुन राजेशिर्के ,सर्व स्कुल कमिटी सदस्य , कलामहाविद्यालयाचे प्राचार्य. माणिक यादव तसेच प्राध्यापकवर्ग यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक व अभिनंदन केले. शैक्षणिक वर्ष २०२५/२६ साठी प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे.अंतिम तारीख ६ जुलै २०२५ आहे.

Total Visitor Counter

3368777
Share This Article