मॉन्सूनचा राज्याला मोठा दिलासा; पुढील दोन दिवसांत संपूर्ण महाराष्ट्र व्यापणार

Gramin Varta
119 Views

मुंबई: जून महिन्याच्या सुरुवातीला काही काळ थांबलेल्या मॉन्सूनने अखेर पुन्हा वेग घेतला असून, मागील २४ तासांत महाराष्ट्राच्या विविध भागांत पावसाने दमदार पुनरागमन केले आहे. भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, मध्य अरबी समुद्रावरून सक्रिय झालेल्या वाऱ्यांमुळे कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाचा जोर वाढला आहे.

८ जूनपासून रखडलेल्या मॉन्सूनच्या प्रवासामुळे राज्यातील शेती आणि जनजीवन काहीसे चिंतेत होते, मात्र आताच्या पोषक हवामानामुळे संपूर्ण राज्यात पावसाची व्यापक शक्यता निर्माण झाली आहे. मॉन्सूनची उत्तर सीमा सध्या अलिबाग, पुणे आणि निजामाबादपर्यंत पोहोचली असून, आगामी ४८ तासांत मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगडसह संपूर्ण महाराष्ट्र मॉन्सूनच्या छायेखाली येईल. या पावसाच्या आगमनामुळे जूनमधील पर्जन्यतूट भरून निघण्यास मदत होणार असून, रखडलेल्या पेरणीच्या कामांना आता गती मिळणार आहे. अरबी समुद्रातील पश्चिमेकडील वारे अधिक सक्रिय झाल्याने कोकण पट्ट्यात आणि घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. २२ ते २६ जून या काळात राज्याच्या बहुतांश भागांत पावसाचे प्रमाण वाढणार असल्याने शेतकरी आणि सर्वसामान्यांसाठी ही एक मोठा दिलासा देणारी बातमी ठरली आहे.

Total Visitors :
4827448
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *