अंबा नदीपात्रात बुडालेल्या ट्रक चालकाचा शोध; SVRSS बचाव पथकाची अवघ्या १५ मिनिटांत कामगिरी

Gramin Varta
423 Views

रायगड: मुंबई-गोवा महामार्गावरील वाकण पुलाजवळ अंबा नदीत बुडालेल्या एका परप्रांतीय ट्रक चालकाचा मृतदेह शोधण्यात सह्याद्री वन्यजीव रक्षणार्थ सामाजिक संस्थेच्या (SVRSS) बचाव पथकाला मोठे यश मिळाले आहे. रविवारी दुपारी नागोठणे पोलिसांकडून नदीत व्यक्ती बुडाल्याची वर्दी मिळताच, या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. सायंकाळी पाचच्या सुमारास बचाव कार्यास सुरुवात करत, पथकाने नदीपात्रातील आव्हानात्मक परिस्थितीत ‘फ्री स्टाईल सर्च’ तंत्राचा वापर केला. अत्यंत तत्परतेने राबविलेल्या या शोध मोहिमेत केवळ १५ मिनिटांच्या अवधीत मृतदेह शोधून बाहेर काढण्यात आला.

ही कामगिरी पूर्ण केल्यानंतर मृतदेह पुढील कायदेशीर प्रक्रियेसाठी नागोठणे पोलिसांकडे सोपवण्यात आला आहे. सध्या या चालकाची ओळख पटविण्याचे काम सुरू असून, कठीण प्रसंगात दाखवलेल्या या साहसी कामगिरीमुळे बचाव पथकाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

Total Visitors :
4827609
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *