नीरव मोदीला दणका: लंडन हायकोर्टाचा १०० कोटींचे कर्ज फेडण्याचा आदेश

Gramin Varta
151 Views

दिल्ली : पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील मुख्य आरोपी आणि फरारी हिरे व्यापारी नीरव मोदीला लंडन हायकोर्टाने एक मोठा कायदेशीर धक्का दिला आहे. लंडन कमर्शियल कोर्टाने नीरव मोदीला बँक ऑफ इंडियाचे १०.७ दशलक्ष डॉलर्स, म्हणजेच भारतीय चलनात सुमारे १०० कोटी रुपयांचे कर्ज त्वरित परत करण्याचे निर्देश दिले आहेत.
न्यायाधीश सायमन टिंकलर यांनी हा निकाल देताना स्पष्ट केले की, नीरव मोदीने बँक ऑफ इंडियाकडून घेतलेल्या कर्जासाठी स्वतः वैयक्तिक हमी दिली होती.

त्यामुळे, ही रक्कम परत करण्यास तो कायदेशीररीत्या बांधील आहे, असे न्यायालयाने नमूद केले. या निर्णयामुळे नीरव मोदीच्या अडचणीत अधिकच वाढ झाली असून, आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याच्यावर कायदेशीर फास आवळला जात असल्याचे दिसून येत आहे. हे कर्ज न फेडल्यास मोदीच्या मालमत्तेवर कायदेशीर कारवाई होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

Total Visitors :
4827223
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *