गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या चार विद्यार्थ्यांची राष्ट्रीय सायबर सुरक्षा मोहिमेसाठी निवड

Gramin Varta
289 Views

रत्नागिरी : येथील गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील चार होतकरू विद्यार्थ्यांची ‘क्विक हिल फाउंडेशन’च्या ‘सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा’ या राष्ट्रीय स्तरावरील मोहिमेसाठी ‘क्लब ऑफिसर्स’ म्हणून निवड करण्यात आली आहे. सायबर सुरक्षेबाबत जनजागृती करणे आणि डिजिटल सुरक्षिततेचा प्रसार करण्याच्या उद्देशाने ही विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. या निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये स्नेहा भिडे (प्रेसिडेंट), राज गुरव (मीडिया डायरेक्टर), आर्या मोहित (सेक्रेटरी) आणि आयुष सनगरे (ॲक्टिव्हिटी डायरेक्टर) यांचा समावेश आहे. हे विद्यार्थी प्रा. केतन जोगळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयात सायबर सुरक्षाविषयक विविध उपक्रमांचे नियोजन आणि अंमलबजावणी करणार आहेत.

महाविद्यालयाने क्विक हिल फाउंडेशनसोबत केलेल्या सामंजस्य करारानंतर (MoU) हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. याद्वारे समाजामध्ये डिजिटल साक्षरता वाढवण्यासाठी कार्यशाळा, परिसंवाद आणि प्रशिक्षण सत्रे आयोजित केली जाणार आहेत. या निवडीबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले असून, विज्ञान शाखेच्या उपप्राचार्या डॉ. अपर्णा कुलकर्णी, संगणक शास्त्र विभाग समन्वयक सौ. अनुजा घारपुरे आणि विभागप्रमुख अमोल सहस्रबुद्धे यांनी या उपक्रमासाठी मोलाचे सहकार्य केले आहे. विद्यार्थ्यांच्या नेतृत्वाखाली राबवण्यात येणारा हा उपक्रम सायबर सुरक्षेच्या क्षेत्रात एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार असून, समाजाला डिजिटल सुरक्षिततेच्या दृष्टीने सक्षम करण्यास मदत करेल.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *