जगबुडी नदी इशारा पातळीवर; चिपळूणमध्ये एनडीआरएफची टीम दाखल

Gramin Varta
811 Views

चिपळूण: खेड शहरातील जगबुडी नदीने इशारा पातळी ओलांडल्यामुळे नदीपात्रातील पाणी पात्राबाहेर पडण्यास सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने शहरातील नागरिक आणि व्यापाऱ्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. संभाव्य धोका लक्षात घेता प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा पूर्णपणे सज्ज झाली असून, सर्व आवश्यक बचाव साहित्य आणि बोटी तैनात ठेवण्यात आल्या आहेत.

परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी एनडीआरएफची (NDRF) विशेष टीम चिपळूणमध्ये दाखल झाली आहे. ३ अधिकारी, २३ जवान आणि ३ वाहनचालक यांचा समावेश असलेली ही टीम १ जुलै रोजी रात्री उशिरा चिपळूणमध्ये पोहोचली. आज या पथकाने चिपळूण शहरातील सखल भागांची आणि संभाव्य पूरग्रस्त ठिकाणांची पाहणी केली. नदीच्या पाणी पातळीत होत असलेली वाढ पाहता, प्रशासनाकडून नदीकाठच्या रहिवाशांना सुरक्षिततेची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सर्व यंत्रणा परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून असून नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Total Visitors :
4827217
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *