तुरळ ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी धोंडू हरी डिके यांची निवड; मान्यवरांकडून सत्कार

Gramin Varta
257 Views

कडवई/ मुजीब खान: येथील तुरळ ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी धोंडू हरी डिके यांची निवड करण्यात आली असून, या निवडीबद्दल ग्रामपंचायत कार्यालयात विविध मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांचा पुष्पगुच्छ, शाल आणि श्रीफळ देऊन जाहीर सत्कार करण्यात आला. धोंडू डिके यांना ग्रामस्थांनी सलग चार वेळा बिनविरोध निवडून देत त्यांच्यावर असलेला विश्वास पुन्हा एकदा सिद्ध केला आहे. ग्रामविकासासाठी त्यांनी केलेले निस्वार्थी कार्य, लोकाभिमुख भूमिका आणि विकासकामांत राखलेले सातत्य यामुळे उपस्थित मान्यवरांनी त्यांचे विशेष कौतुक केले. याप्रसंगी पंचायत समिती सदस्या सौ. अपर्णा जाधव, सरपंच रामचंद्र हरेकर, आरडीसी बँकेचे संचालक राजेंद्रजी सुर्वे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, पत्रकार रमेश डिके आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी धोंडू डिके यांना पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा देतानाच, त्यांच्याकडून गावाच्या सर्वांगीण विकासासाठी अधिक प्रभावी कामगिरीची अपेक्षा व्यक्त केली.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *