एसटीच्या ७८ व्या वर्धापन दिनानिमित्त राज्यभर वृक्षारोपण उपक्रम अंतर्गत लांजा आगारात वृक्षारोपण उपक्रम उत्साहात

Gramin Varta
283 Views

लांजा/अरबाज नेवरेकर :-महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या आदेशानुसार तसेच महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ७८ व्या वर्धापन दिनानिमित्त राज्यभर राबविण्यात आलेल्या वृक्षारोपण अभियानांतर्गत लांजा एसटी आगारात मंगळवारी उत्साहात वृक्षारोपण करण्यात आले.

पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत आगार परिसरात विविध देशी वृक्षांची लागवड करण्यात आली.

या उपक्रमासाठी काजू, जांभूळ, कोकम, बेहडा, वड, आपटा आणि फणस या वृक्षांच्या रोपांची लागवड करण्यात आली. गवाणे सामाजिक वनीकरण यांच्या माध्यमातून २०० रोपे, तर श्रीकृष्ण हेगिष्टे यांच्या प्रयत्नातून भांबेड वन विभागाकडून १०० रोपे उपलब्ध झाल्याने एकूण ३०० रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले. वृक्षारोपणाबरोबरच त्यांचे संवर्धन करण्याचा निर्धारही उपस्थितांनी व्यक्त केला.

यावेळी पंचायत समिती सभापती मानसी आंबेकर, शिवसेना तालुकाप्रमुख गुरुप्रसाद देसाई, विभागप्रमुख दिनेश पवार, पंचायत समिती सदस्य दीपाली साळवी, वृषाली चव्हाण, रसिका मेस्त्री, शैलेश खामकर, दीपक कदम, प्रवासी संघटनेचे सचिव रविंद्र राणे व सदस्य जितेंद्र चव्हाण, विभागीय भांडार अधिकारी भक्ती वेल्हाळ-फुटाणे, आगार व्यवस्थापक काव्या पेडणेकर,स. वा. नि. राजू पाटोळे, प्रभारी कार्यशाळा प्रमुख प्रकाश झोरे, लांजा वनपाल धुळू कोळेकर, वनरक्षक श्रावणी पवार, नमिता कांबळे, अमित लांजेकर ,यांच्यासह साई जुवेकर,आदी चालक वाहक तसेच लांजा एसटी आगारातील सर्व अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमातून पर्यावरण संवर्धनासाठी प्रत्येकाने किमान एक वृक्ष लावून त्याचे संगोपन करण्याचे आवाहन करण्यात आले.

Total Visitors :
4826830
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *