रत्नागिरी : शहरात सार्वजनिक ठिकाणी वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याप्रकरणी दोन चालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना १४ जुलै २०२५ रोजी दुपारी १:४५ वाजताच्या सुमारास धनजीनाका ते मच्छीमार्केट रस्त्यावर, झमझम एंटरप्रायझेस दुकानासमोर घडली.
पहिल्या घटनेत शहर पोलीस ठाण्याचे पोलीस हेड कॉन्स्टेबल वैभव प्रकाश नार्वेकर (वय ३७) यांनी फिर्याद दिली आहे. तर प्रमोद दत्ताराम शेलार (वय ४५, रा. आजगे, तेलीवाडी, ता. लांजा) असे आरोपीचे नाव आहे. शेलार जितो टेम्पो रस्त्यात अशा पद्धतीने उभा केला होता, ज्यामुळे रहदारीस अडथळा निर्माण झाला.
तर दुसऱ्या घटनेत कुवारबाव पोलीस चौकीसमोर, रत्नागिरी ते हातखंबा रस्त्यावर, रेल्वे स्टेशन फाट्याजवळ सार्वजनिक वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना १५ जुलै २०२५ रोजी सकाळी १०:४७ वाजताच्या सुमारास घडली.
रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस हेड कॉन्स्टेबल राकेश वसंत तटकरी यांनी फिर्याद दिली आहे. सुलेमान अशफाक सोलकर (वय ४५, रा. कातळी, ता. राजापूर) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोलकर याने त्याच्या ताब्यातील महिंद्रा जितो चारचाकी टेम्पो रेल्वे स्टेशन फाट्यावर रस्त्यावर उभा करून वाहनांना येण्या-जाण्यास तसेच रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या वाहनांना व पादचाऱ्यांना रहदारीस अडथळा निर्माण केला. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.