गणपतीपुळे दर्शनावरून परतणाऱ्या सोलापूरच्या भाविकांच्या कारचा अपघात; वाहन १५ फूट दरीत कोसळले

Gramin Varta
312 Views

रत्नागिरी : संकष्टी चतुर्थीनिमित्त गणपतीपुळे येथे श्रींच्या दर्शनासाठी आलेल्या सोलापूर येथील भाविकांच्या सफारी कारला परतीच्या प्रवासात अपघात झाला. गणपतीपुळे–निवळी मार्गावरील तिवराड पोलिस चौकीच्या पुढे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कार थेट सुमारे १० ते १५ फूट खोल दरीत कोसळली. या अपघातात कारमधील प्रवासी जखमी झाले असून त्यांची नावे समजू शकली नव्हती.

मिळालेल्या माहितीनुसार, (एमएच १३ डीटी ८३५३) क्रमांकाची सफारी कार सोलापूर येथील भाविकांना घेऊन गणपतीपुळ्यात दर्शनासाठी आली होती. दर्शन आटोपून हे भाविक परतीच्या प्रवासाला निघाले असताना तिवराड पोलिस चौकीच्या पुढे चालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि कार रस्त्यालगतच्या दरीत कोसळली.

अपघाताची तीव्रता इतकी मोठी होती की, वाहनाच्या दर्शनी भागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना मदत केली. या दुर्घटनेत प्रवाशांना दुखापती झाल्या असल्या तरी सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

Total Visitors :
4631826
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *