प्राथमिक आरोग्य केंद्र मालगुंडला हॉटेल नक्षत्रकडून ५५ हजारांची अत्यावश्यक औषधे

Gramin Varta
239 Views

गणपतीपुळे : प्राथमिक आरोग्य केंद्र मालगुंड येथील रुग्णांना आवश्यक असलेल्या औषधांची उपलब्धता वाढावी, यासाठी हॉटेल नक्षत्र, गणपतीपुळेचे मालक लक्ष्मीकांत सरपोतदार सर यांच्या वतीने सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून सीएसआर (CSR) निधीतून सुमारे ५५ हजार रुपये किमतीची अत्यावश्यक औषधे उपलब्ध करून देण्यात आली.

प्राथमिक आरोग्य केंद्र मालगुंड येथे येणाऱ्या रुग्णांना वेळेवर औषधोपचार मिळावेत, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. हॉटेल नक्षत्रच्या या सामाजिक योगदानामुळे आरोग्य केंद्रातील औषधांची उपलब्धता वाढण्यास मदत होणार असून, परिसरातील नागरिकांना त्याचा लाभ मिळणार आहे.

या औषधांची उपलब्धता करून देण्यासाठी आरोग्य निरीक्षक डॉ. परशुराम निवेंडकर यांनी विशेष प्रयत्न केले. त्यांच्या पाठपुराव्यामुळे हॉटेल नक्षत्र, गणपतीपुळे यांनी सीएसआरच्या माध्यमातून हा उपक्रम राबविला.

आरोग्य विभागाच्या सेवेला सामाजिक संस्थांसह व्यावसायिक आस्थापनांकडून मिळणारे असे सहकार्य निश्चितच कौतुकास्पद असून, या उपक्रमाबद्दल हॉटेल नक्षत्र व्यवस्थापनाचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.तसेच प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ सुनीता पवार, डॉ ऋषिकेश डोके व कर्मचारी यांनी आभार मानले आहेत

- Advertisement -
Total Visitors :
4675180
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *