मंडणगड पोलिसांच्या कार्यतत्परतेमुळे वाट चुकलेला मुलगा सुखरूप पालकांच्या सुपूर्द

Gramin Varta
132 Views

मंडणगड : मंडणगड पोलीस स्थानकाच्या उल्लेखनीय कार्यतत्परतेमुळे वाट चुकलेल्या आणि दापोली-नालासोपारा एसटी बसमधून विनातिकीट प्रवास करणाऱ्या ऋषिकेश रत्नकांत कोळंबेकर या गतिमंद मुलास अवघ्या दोन दिवसांत त्याच्या पालकांपर्यंत पोहोचवण्यात यश आले आहे.

दहा ऑगस्ट रोजी दापोली ते नालासोपारा जाणाऱ्या एस.टी. बसमध्ये हा मुलगा विनातिकीट प्रवास करत असल्याचे बसचे चालक व वाहक यांच्या लक्षात आले. त्यानंतर दापोली आगाराच्या कर्मचाऱ्यांनी या मुलाला मंडणगड पोलीस ठाण्याच्या हवाले केले. पोलीस ठाण्यातील अंमलदार तेजस मोरे यांनी या मुलाची बिकट परिस्थिती गांभीर्याने घेत त्याच्यावर विशेष लक्ष केंद्रित केले. तसेच, पोलिसांच्या वतीने त्याच्या नातेवाईकांचा शोध घेण्यासाठी तातडीने मोहीम सुरू करण्यात आली.
या शोधमोहिमेदरम्यान सोशल मीडियाचा प्रभावी वापर करण्यात आला, ज्यामुळे अतिशय कमी वेळेत मुलाच्या नातेवाईकांचा शोध पूर्ण करणे शक्य झाले. नातेवाईक पोलीस ठाण्यात सुखरूप हजर झाल्यानंतर पोलिसांनी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करत त्या मुलाला त्याच्या पालकांच्या स्वाधीन केले. या प्रसंगी पोलिसांच्या संवेदनशीलता आणि कार्यतत्परतेचे संपूर्ण तालुक्यातून जोरदार कौतुक होत आहे.

Total Visitors :
4685557
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *