लांजातील पाच मान्यवरांचा कोल्हापुर येथे  राष्ट्रीय फिनिक्स ग्लोबल पुरस्काराने गौरव

Gramin Varta
296 Views

लांजा : कै. बसवंत नागू शिंगाडे चॅरिटेबल ट्रस्ट, बेडकिहाळ यांच्या वतीने आयोजित ग्रामीण मराठी साहित्य संमेलन २०२६ व राष्ट्रीय फिनिक्स ग्लोबल पुरस्कार २०२६ सोहळा कोल्हापूर येथे उत्साहात पार पडला. या सोहळ्यात लांजा तालुक्यातील शिक्षण, क्रीडा, सामाजिक आणि कला क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पाच मान्यवरांचा गौरव करण्यात आला.

कार्यक्रमाची सुरुवात डॉ. संजय पाटील, डॉ. शांताराम कारांडे व शुभांगी शिंत्रे (मिसेस इंडिया) यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली.

यावेळी राजेश गोसावी यांना आदर्श शिक्षक पुरस्कार, रवींद्र वासूरकर यांना आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्कार, अरबाज नेवरेकर यांना आदर्श समाज गौरव पुरस्कार, सचिन कांबळे यांना आदर्श शिक्षक  पुरस्कार, तर अमोल जाधव यांना आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

लांजा तालुक्यातील पाचही मान्यवरांच्या कार्याची राष्ट्रीय पातळीवर दखल घेत झालेला हा गौरव लांजासाठी अभिमानाची बाब ठरली आहे. शिक्षण, क्रीडा, सामाजिक व कला क्षेत्रातील त्यांच्या योगदानामुळे लांजाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.

कार्यक्रमाला ॲड. ब्रिजेश शास्त्री, प्रा. रईसा मुल्ला, मल्लेश चांदणे, ह.भ.प. प्रा. डॉ. मारुती पाटील, प्रमोद पाटील, प्रा. नितीन जाधव, रविंद्र शास्त्री, प्रकाश धनगर, प्रा. विठ्ठल नाईक, सचिन आठवले, डॉ. सुनील फरांदे, अनिल कानडे व सुदाम हिंगे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. विक्रम शिंगाडे होते.

Total Visitors :
4754755
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *