निढळेवाडीतील विविध प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याची ग्रामस्थांची मागणी

Gramin Varta
37 Views

संगमेश्वर:- निढळेवाडी गावातील विविध प्रलंबित विकासकामे तातडीने पूर्ण करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाच्या कामामुळे गावातील काही मूलभूत सुविधांवर परिणाम झाला असून, संबंधित ठेकेदार तसेच बांधकाम विभागाने याकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी करण्यात आली आहे.

निढळेवाडी स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता, तसेच निढळेवाडी बसस्टॉपजवळून गावात येणारी पाखडी यांची कामे प्रलंबित आहेत. त्यामुळे ग्रामस्थांना ये-जा करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.दरम्यान, निढळेवाडीतील भेळेकरीण देवस्थान परिसरातील मोरी पूर्वीच्या ठिकाणी बंद करून दुसऱ्या बाजूला मोरी टाकण्यात आल्याने पावसाचे पाणी वाहून जाण्यास अडथळा निर्माण झाला आहे. त्यामुळे हलका पाऊस झाला तरी देवस्थान परिसर पाण्याखाली जात असल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली आहे.

महामार्ग चौपदरीकरणाचे काम करणारे ठेकेदार आणि बांधकाम विभाग यांनी ग्रामस्थांच्या समस्यांची दखल घेऊन स्मशानभूमी रस्ता, गावातील पाखडी तसेच देवस्थान परिसरातील पाण्याचा निचरा होण्यासाठी आवश्यक असलेली मोरीची व्यवस्था तातडीने पूर्ण करावी, अशी मागणी निढळेवाडी ग्रामस्थांनी केली आहे.

Total Visitors :
4761326
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *