संगमेश्वर : मांजरे येथे एसटीची दुचाकीला जोरदार धडक; दोघे जखमी; बस चालकावर गुन्हा

Gramin Varta
168 Views

संगमेश्वर : आबलोली-जाकादेवी मार्गावरील मांजरे बुडबुड्याचे पाणी येथे एसटी बस आणि अॅक्टीवा मोटारसायकल यांच्यात झालेल्या अपघातात मोटारसायकल चालकासह एक जण जखमी झाला. हा अपघात २८ ऑगस्ट रोजी दुपारी सव्वा एकच्या सुमारास घडला. याप्रकरणी संगमेश्वर पोलिस ठाण्यात एसटी बसचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विघ्नेश अनंत चव्हाण (वय १८, रा. राई रांजेवाडी, ता. जि. रत्नागिरी) हा आपल्या ताब्यातील अॅक्टीवा मोटारसायकल (एमएच ४६ बीजी ८१४९) वर वडील अनंत तुकाराम चव्हाण (वय ६०) आणि आई रुपाली अनंत चव्हाण (वय ५६) यांना बसवून राई ते काजुर्ली असा प्रवास करीत होता. ते आबलोली ते जाकादेवी मार्गावरील मांजरे बुडबुड्याचे पाणी येथे आले असता समोरून रत्नागिरी एसटी डेपोची बस (एमएच ४० एन ९८७०) येत होती.

या बसचा चालक पुंडलीक शिवाजी केंद्रे (वय ३५, रा. केंद्रेवाडी, ता. अहमदपूर, जि. लातूर; सध्या रा. कारवांचीवाडी, रत्नागिरी) याने बस हयगयीने व अविचाराने वेगाने चालवून रस्त्याच्या उजव्या बाजूला येत मोटारसायकलला धडक दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या अपघातात मोटारसायकल चालक विघ्नेश चव्हाण आणि मागे बसलेले अनंत चव्हाण यांना लहान-मोठ्या दुखापती झाल्या असून दोन्ही वाहनांचे नुकसान झाले.

याप्रकरणी प्रमोद अशोक जगताप (वय ४३, व्यवसाय शेती, रा. काजुली मळेवाडी, ता. गुहागर, जि. रत्नागिरी) यांनी संगमेश्वर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी आरोपी बसचालक पुंडलीक केंद्रे याच्याविरुद्ध गुन्हा क्रमांक १०४/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता अधिनियम २०२३ मधील कलम २८१, १२५ (अ), १२५ (ब) तसेच मोटार वाहन कायद्यातील कलम १८४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. अपघाताची पुढील तपासणी संगमेश्वर पोलिस करीत आहेत.

Total Visitors :
4776688
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *