मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात; थार गाडी उलटून दोन महिलांचा मृत्यू, तीन जण गंभीर

Gramin Varta
660 Views

सिंधुदुर्ग: मुंबई-गोवा महामार्गावर नेमळे येथे रविवारी झालेल्या एका भीषण रस्ते अपघातात दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला असून, तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. कणकवलीतील भिरवंडे येथे जात असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने भरधाव थार गाडी रस्त्याबाहेर जाऊन कोसळली. गाडीचा वेग प्रचंड असल्याने हा अपघात इतका भीषण होता की कारचा चक्काचूर झाला. या दुर्घटनेत गिरिम ग्रामपंचायतीच्या सदस्या श्रीमती पांडुरंग नानोडकर (५८) आणि कणकवली येथील रहिवासी विलासिनी सातारडेकर (५४) यांचा दुर्दैवी अंत झाला. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्यास सुरुवात केली.

या अपघातात सनी नानोडकर (३६), उज्ज्वला कांबळी (४८) आणि पांडुरंग नानोडकर (६५) हे तिघे गंभीर जखमी झाले असून, त्यांना तातडीने उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. तेथील प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी त्यांना गोवा येथील बांबोळी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, महामार्गावरील अतिवेगाच्या धोक्याबाबत पुन्हा एकदा चिंता व्यक्त केली जात आहे.

Total Visitors :
4576507
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *