देवरूखचे डॅशिंग पोलीस निरीक्षक उदय झावरे यांची पोलीस उपअधीक्षकपदी पदोन्नती; रायगडमध्ये नियुक्ती

Gramin Varta
259 Views

देवरूख: देवरूख पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उदय झावरे यांची रायगड येथे पोलीस उपअधीक्षकपदी बढती झाली आहे. राज्य सरकारच्या गृह विभागाकडून सेवा ज्येष्ठतेनुसार ही पदोन्नती देण्यात आली आहे. देवरूखमध्ये पोलीस निरीक्षक पदाचा कार्यभार स्वीकारल्यापासून उदय झावरे यांनी आपल्या कडक शिस्तीच्या आणि धडाकेबाज कार्यपद्धतीने गुन्हेगारी क्षेत्रावर वचक निर्माण केला होता. त्यांच्या कार्यकाळात अनेक गुन्ह्यांचा छडा लावण्यात त्यांना यश आले असून, एक कार्यक्षम अधिकारी म्हणून त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली होती.

येत्या २७ जून रोजी त्यांच्या कार्यकाळाला एक वर्ष पूर्ण होणार होते, मात्र त्यापूर्वीच त्यांना मिळालेल्या या पदोन्नतीमुळे देवरूखमधून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. उदय झावरे यांच्या बदलीमुळे देवरूख पोलीस दलातील एका धडाकेबाज नेतृत्वाची कारकीर्द यशस्वीरीत्या पूर्ण झाली असून, आता ते रायगड येथे पोलीस उपअधीक्षक म्हणून आपली पुढील सेवा बजावणार आहेत.

Total Visitors :
4577002
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *