रत्नागिरीतसील केलेल्या घरात कुटुंबासह वास्तव्य; अतिक्रमणाचा गुन्हा दाखल

Gramin Varta
395 Views

रत्नागिरी : न्यायालयाच्या आदेशानुसार सील करण्यात आलेल्या घराचा सील तोडून अनधिकृतपणे प्रवेश केल्याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात एका व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना जावे ग्रामपंचायत हद्दीतील कर्ला परिसरात १ जुलै २०२६ रोजी दुपारी १.३० वाजल्यापासून २ जुलै २०२६ रोजी दुपारी ३.३० वाजेपर्यंत घडल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

याप्रकरणी राजीव कुमार श्री विश्वेश्वर प्रसाद (वय ५१, रा. बँक ऑफ इंडिया झोनल ऑफिसर क्वार्टर क्रमांक बी-९, शिवाजीनगर, रत्नागिरी) यांनी तक्रार दाखल केली आहे. तक्रारीनुसार, कर्ला येथील ग्रामपंचायत मालमत्ता सर्वे क्रमांक १० ए, हिस्सा क्रमांक ११, १२, १३ व २० तसेच घर क्रमांक ८३० हे न्यायालयीन प्रक्रियेनुसार कोर्ट कमिशनर यांच्या आदेशाने सील करून तक्रारदार यांच्या ताब्यात देण्यात आले होते.

मात्र, आरोपी दिगंबर शंकर कीर (रा. जुवे ग्रामपंचायत, कार्ला, ता. रत्नागिरी) यांनी संबंधित सील तोडून घरात प्रवेश केला आणि आपल्या कुटुंबासह तेथे वास्तव्यास असल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

या प्रकरणी भारतीय दंड विधानाच्या कलम ३२९(४) अंतर्गत रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलिस करत आहेत. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया ५ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी २ वाजता करण्यात आली.

Total Visitors :
4654149
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *