रत्नागिरीत प्रथमच ‘शाना’ज ब्युटी केअर अँड एस्थेटिक’तर्फे मोफत स्किन व हेअर चेकअप शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

Gramin Varta
316 Views

रत्नागिरी : शहरात प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या ‘शाना’ज ब्युटी केअर अँड एस्थेटिक’तर्फे मोफत स्किन व हेअर चेकअप शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. दोन दिवस चाललेल्या या विशेष शिबिरात १५० हून अधिक नागरिकांनी सहभाग नोंदवत त्वचा व केसांच्या समस्यांबाबत तज्ज्ञांकडून मार्गदर्शन आणि तपासणी करून घेतली.

या शिबिरात ४० वर्षांहून अधिक अनुभव असलेल्या स्किन एक्स्पर्ट मनीषा जगदाळे यांनी सहभागी होत नागरिकांच्या विविध त्वचारोग, त्वचेची निगा आणि उपचारांबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच नॅशनल हेअर टेक्निशियन संदीप सूर्यवंशी यांनी केसांशी संबंधित समस्या, त्यावरील आधुनिक उपचारपद्धती आणि योग्य निगा याबाबत सल्ला दिला. त्यांच्या अनुभवाचा मोठा लाभ रत्नागिरीकरांना मिळाला.

शिबिरात सहभागी झालेल्या अनेक नागरिकांनी तपासणी, मार्गदर्शन आणि मिळालेल्या उपचारांविषयी समाधान व्यक्त करत सकारात्मक अनुभव शेअर केले. काहींना प्राथमिक उपचारांमधून चांगले परिणामही दिसून आल्याचे त्यांनी सांगितले.

शिबिराला मिळालेला भरघोस प्रतिसाद आणि नागरिकांची वाढती मागणी लक्षात घेता येत्या रविवारी पुन्हा एकदा मोफत स्किन व हेअर चेकअप शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराचे आयोजन डॉ. शाना मेमन यांच्या ‘शाना’ज ब्युटी केअर अँड एस्थेटिक’तर्फे करण्यात आले असून, इच्छुक नागरिकांनी सहभागी होण्यासाठी 70202 99372 या  संपर्क क्रमांकावर नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Total Visitors :
4645743
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *