वालावलकर हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी स्वरयंत्राजवळ अडकलेले चिकनचे हाड यशस्वीरीत्या काढले बाहेर

Gramin Varta
515 Views

चिपळूण: एका ५३ वर्षीय चिपळूण येथील रहिवासी असलेल्या माणसाला रात्री जेवत असताना ठसका लागला व नंतर त्याचा घसा दुखू लागला. तो रुग्ण वालावलकर हॉस्पिटलच्या अपघात विभागात रात्री दहा वाजेच्या सुमारास आला तेव्हा इ.एन.टी सर्जन डॉ. प्रतीक शहाणे यांनी त्यांची इएनटी ओपीडी मध्ये इंडॉस्कोपिक तपासणी केली असता असे निदर्शनास आले की चिकनचे हाड हे स्वर यंत्राजवळ अडकलेले आहे. क्षणाचाही विलंब न करता डॉक्टरांनी रुग्णाला ॲडमिट होऊन ऑपरेशन करून ते चिकनचे हाड काढण्याचा सल्ला दिला. रुग्नाने ही डॉक्टरांवर पूर्ण विश्वास दाखवित ऑपरेशनसाठी लागणाऱ्या प्राथमिक तपासण्या व सिटीस्कॅन करून घेतले.

ऑपरेशनसाठी रुग्णाचा फिटनेस मिळाल्यावर लगेचच सकाळी रुग्णाला ऑपरेशनसाठी घेण्यात आले. इ.एन.टी सर्जन डॉ. प्रतीक शहाणे यांनी अतिशय कुशलतेने एन्डोस्कोपिकली कुठेही चिरफाड न करता चिकनचे हाड बाहेर काढले व रुग्णाचे प्राण वाचवले. या ऑपरेशनमध्ये डॉ. योषिता व श्वेता घाणेकर सिस्टर यांनी डॉक्टरांना सहाय्य केले तसेच डॉ. निवेदिता, डॉ. अभिजीत व डॉ. मयूर यांनी अत्यंत क्लिष्ट शस्त्रक्रियेसाठी भूल देण्याचे काम केले. वालावलकर रुग्णालयामध्ये अत्यंत कुशल डॉक्टर असल्याकारणाने व रुग्णालयात महात्मा फुले जन योजना असल्याकारणाने हे रुग्णालय कोकणातील गरजू रुग्णांसाठी तारणहार बनले आहे, असे प्रतिपादन रुग्णालयाच्या संचालिका डॉ. सुवर्णा पाटील यांनी केले.

Total Visitors :
4660157
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *