लांजा : ओझर येथील सार्वजनिक रस्त्यावर आपापसात भांडण करून सार्वजनिक शांतता भंग करणाऱ्या दोन जणांवर लांजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना ७ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी १२ वाजून ३० मिनिटांच्या सुमारास घडली असून या प्रकरणी लांजा पोलीस ठाण्यात कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, लांजा ओझर येथील सार्वजनिक रोडवर सिकंदर कांबळे वय ३४ वर्षे रा. बौद्धवाडी लांजा आणि अमित बबन जाधव वय ३१ वर्षे रा. लांजा न्हावी वाडी हे दोघे एकमेकांना हाताच्या थापटाने मारहाण करून शिवीगाळ व दमदाटी करत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. हे दोघे आपापसात भांडण करून सार्वजनिक शांतता भंग करत असताना आढळल्याने त्यांच्यावर भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १९४(२) प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास लांजा पोलीस करत आहेत.






