माचाळ पर्यटनस्थळी वाहन तपासणी; २७ वाहनचालकांवर कारवाई

Gramin Varta
960 Views

लांजा/अरबाज नेवरेकर : लांजा तालुक्यातील प्रसिद्ध माचाळ या वर्षा पर्यटनस्थळी पावसाळ्यात मोठ्या संख्येने पर्यटक भेट देत असल्याने वाहतुकीत शिस्त राखण्यासाठी आणि पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने लांजा पोलिसांकडून वाहनांची नियमित तपासणी करण्यात येत आहे.

या तपासणी मोहिमेदरम्यान मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या एकूण २७ वाहनचालकांविरुद्ध  कायदेशीर कारवाई करण्यात आली. वाहनांची आवश्यक कागदपत्रे, वाहनचालकांचा परवाना, तसेच इतर वाहतूक नियमांची पडताळणी करून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.

माचाळ हे पावसाळ्यातील लोकप्रिय पर्यटनस्थळ असल्याने प्रत्येक आठवड्याच्या शेवटी येथे मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी होत असते. त्यामुळे वाहतूक सुरळीत राहावी, अपघातांना प्रतिबंध व्हावा आणि पर्यटकांनी सुरक्षित प्रवास करावा, या उद्देशाने ही तपासणी मोहीम सातत्याने राबविण्यात येत असल्याची माहिती लांजा पोलिस निरीक्षक निलकंठ बगळे यांनी दिली.

पर्यटकांनी वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, वाहन चालविताना आवश्यक कागदपत्रे सोबत ठेवावीत, मद्यपान करून वाहन चालवू नये तसेच अतिवेग टाळून सुरक्षित वाहनचालना करावी, असे आवाहनही पोलिस निरीक्षक निलकंठ बगळे यांनी केले.

Total Visitors :
4576146
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *