चिपळूणच्या अभिषेक गिजरेची नामिबियातील UNDP मध्ये भारतातून एकमेव निवड

Gramin Varta
6 Views

संयुक्त राष्ट्रांच्या विंडहोक मुख्यालयात रुजू; कम्युनिकेशन सपोर्ट म्हणून देशाच्या विकास कार्यक्रमात देणार योगदान

चिपळूण : चिपळूणच्या पाग परिसरातील रहिवासी आणि सध्या पुणे येथे वास्तव्यास असलेले प्रसाद गिजरे यांचे सुपुत्र अभिषेक गिजरे यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय यश संपादन केले आहे. संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम अर्थात UNDP (United Nations Development Programme), नामिबिया येथील कंट्री लेव्हल प्रोग्रामसाठी कम्युनिकेशन सपोर्ट म्हणून संपूर्ण भारतातून त्यांची एकमेव निवड झाली आहे.

या महत्त्वपूर्ण निवडीनंतर अभिषेक गिजरे यांनी नामिबियाची राजधानी विंडहोक येथील संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयात रुजू होत आपल्या कामाला सुरुवात केली आहे. UNDPच्या माध्यमातून नामिबियात राबविण्यात येणाऱ्या विविध विकासात्मक उपक्रमांची माहिती प्रभावीपणे लोकांपर्यंत पोहोचविणे, विकासकामांच्या प्रभावी संवादासाठी सहकार्य करणे तसेच कार्यक्रमांचा प्रसार करण्याची महत्त्वाची जबाबदारी ते पार पाडणार आहेत.

चिपळूणच्या मातीतून घडलेल्या अभिषेक यांची थेट संयुक्त राष्ट्रांच्या विकास कार्यक्रमासाठी झालेली निवड ही स्थानिकांसाठी विशेष अभिमानाची बाब मानली जात आहे. भारतातून या कार्यक्रमासाठी एकमेव निवड झाल्याने त्यांच्या या यशाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

अभिषेक यांच्या या आंतरराष्ट्रीय यशामुळे गिजरे कुटुंबीय, पाग परिसर तसेच चिपळूणकरांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. सचिन खरे यांच्यासह मित्रपरिवार आणि हितचिंतकांकडून अभिषेक यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

अभिषेक गिजरे यांच्या या उल्लेखनीय आंतरराष्ट्रीय वाटचालीमुळे चिपळूणच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

Total Visitors :
4670666
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *