विद्यार्थ्यांच्या सुरक्षित व उज्ज्वल भविष्यासाठी रत्नागिरी पोलिसांचे कौतुकास्पद पाऊल; मिशन रायझिंग फ्लॉवर्सअंतर्गत महिला सुरक्षा समिती व भरोसा सेलची महत्त्वाची बैठक संपन्न

Gramin Varta
116 Views

रत्नागिरी: रत्नागिरी पोलीस दलामार्फत विद्यार्थ्यांच्या सुरक्षित व उज्ज्वल भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असा मिशन रायझिंग फ्लॉवर्स हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येत असून, या उपक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पोलीस अधीक्षक कार्यालय रत्नागिरी येथे महिला सुरक्षा समितीवरील अशासकीय सदस्य तसेच भरोसा सेल समितीवरील सदस्यांची एक विशेष संयुक्त बैठक पार पडली. सदर बैठकीमध्ये पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी उपस्थित सर्व सदस्यांना या नाविन्यपूर्ण उपक्रमाची सविस्तर माहिती दिली आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षित भविष्यासाठी या मोहिमेत सर्व सदस्यांनी सक्रिय सहभाग घेऊन विद्यार्थ्यांना योग्य व मोलाचे मार्गदर्शन करण्याचे आवाहन केले.

या बैठकीदरम्यान उपस्थित सर्व सदस्यांनी रत्नागिरी पोलीस दलाच्या या उपक्रमाच्या उद्दिष्टांबाबत अत्यंत सकारात्मक प्रतिसाद दिला असून, जिल्ह्यातील प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचून जनजागृती करण्यासाठी आणि त्यांना योग्य मार्गदर्शन करण्यासाठी पोलीस प्रशासनास सर्वतोपरी आवश्यक ते सहकार्य करण्याची ठाम ग्वाही दिली आहे.

Total Visitors :
4678597
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *