रत्नागिरी : शहरातील नाचणे परिसरात विंचू झाडून घराच्या गेटच्या आत ढकलत महिलेसह तिच्या मुलीला शिवीगाळ केल्याप्रकरणी ७२ वर्षीय महिलेविरुद्ध रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना ७ ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास श्रीराम नगर, नाचणे येथील सार्थ सावरी बंगला परिसरात घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी स्नेहा संदिप गुरव (वय ४५, रा. सार्थ सावरी बंगला, श्रीराम नगर, नाचणे, रत्नागिरी) यांच्या तक्रारीनुसार, आरोपी प्रिती पद्माकर मयेकर (वय ७२, रा. बंगला नं. १६९१ ए, श्रीराम नगर, नाचणे) यांनी फिर्यादी आणि त्यांची मुलगी कु. सार्थकी गुरव यांच्या जिवाला धोका निर्माण होईल, या उद्देशाने विंचू झाडून फिर्यादी यांच्या बंगल्याच्या गेटच्या आत ढकलल्याचा आरोप आहे.
यावेळी आरोपी महिलेने फिर्यादी यांच्या मुलीला अपशब्द वापरत शिवीगाळ केल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकारामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.
याप्रकरणी स्नेहा गुरव यांच्या फिर्यादीवरून रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २६३/२०२६ अन्वये संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलिस करीत आहेत.
रत्नागिरीत विंचू झाडून गेटमध्ये ढकलल्याचा आरोप; महिलेसह मुलीला शिवीगाळ, ७२ वर्षीय महिलेविरुद्ध गुन्हा
Leave a Comment




