खेडमध्ये १६ वर्षीय युवतीचा आकस्मिक मृत्यू

Gramin Varta
111 Views
One pair of Feet alone in Bed on White Sheets sleeping under a blanket, relaxion cute

खेड : तालुक्यातील तळे मांडवे येथील मयुरी कैलास जगताप (वय १६) या युवतीचा झोपेतच अचानक प्रकृती बिघडल्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेची नोंद खेड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मयुरी ही आपल्या आई-वडिलांसह भावंडांसोबत रात्री जेवण करून झोपण्यासाठी गेली होती. दरम्यान, तिचे नातेवाईक राजेंद्र रामचंद्र वाघे हे त्यांच्या खोलीत टीव्ही पाहत असताना रात्री सुमारे १२ वाजण्याच्या सुमारास त्यांना जोरात घोरण्याचा आवाज ऐकू आला. त्यांनी मयुरीच्या खोलीत जाऊन तिला उठवण्याचा प्रयत्न केला. मात्र, ती बेशुद्ध अवस्थेत होती आणि कोणतीही हालचाल करीत नव्हती.

तिच्या चेहऱ्यावर पाणी मारूनही मयुरीने कोणताही प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर नातेवाईकांनी तिला उपचारासाठी कळंबणी येथील रुग्णालयात दाखल केले. मात्र, रुग्णालयातील डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर मयुरीला मृत घोषित केले. तिच्या अचानक झालेल्या मृत्यूने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. घटनेची नोंद खेड पोलिस ठाण्यात करण्यात आली असून पोलिसांकडून पुढील कार्यवाही सुरू आहे.

Total Visitors :
4668317
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *