खेड: कोकाकोला कंपनीने स्थानिक भूमिपुत्रांना कामावरून काढल्याप्रकरणी ॲड. वैभव खेडेकर आक्रमक

Gramin Varta
326 Views

खेड: लोटे एमआयडीसीतील कोकाकोला कंपनीने स्थानिक भूमिपुत्रांना कोणतीही पूर्वसूचना न देता अचानक कामावरून काढून टाकल्याप्रकरणी भाजप नेते तथा खेड नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष ॲड. वैभव खेडेकर आक्रमक झाले असून, त्यांनी कंपनीच्या एचआर मॅनेजरसह इतर अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले आहे.

खेड तालुक्यातील लोटे एमआयडीसीमध्ये प्रसिद्ध असणारी कोकाकोला कंपनी गेल्या काही महिन्यांपासून कार्यरत आहे, जिथे खेड तालुक्यातील काही स्थानिकांनी भूमिपुत्र म्हणून नियमितपणे काम करत होते. मात्र, कंपनी प्रशासनाने कोणतीही कायदेशीर किंवा पूर्वसूचना न देता या आठ ते दहा स्थानिक कामगारांना अचानक कामावरून कमी केले, ज्यामुळे स्थानिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. हाच गंभीर प्रकार लक्षात घेऊन ॲड. वैभव खेडेकर यांनी तातडीने हस्तक्षेप करत कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना जाब विचारला आणि आठ दिवसांच्या आत या सर्व संबंधित भूमिपुत्रांना सन्मानाने पुन्हा कामावर सामावून घ्यावे, अन्यथा कंपनीविरोधात तीव्र स्वरूपाचे जनआंदोलन छेडण्यात येईल, असा सज्जड दम व इशारा यादरम्यान देण्यात आला आहे.

Total Visitors :
4840011
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *