संगमेश्वर :मुंबई-गोवा महामार्गावर आरवली नजिक खेरशेत कासे फाटा येथे मुंबईहून सावंतवाडीच्या दिशेने जाणाऱ्या एसटी बसला (एमएच १४ एमएच ६४५०) भीषण अपघात झाला आहे.
चालकाचे एसटीवरील नियंत्रण सुटल्याने आणि बसचे ब्रेक फेल झाल्याने ही बस पुढे चाललेल्या एका १६ चाकी ट्रकला मागून धडकली.
ही धडक इतकी जोरदार होती की, एसटी बसचा पुढचा भाग पूर्णपणे चक्काचूर झाला आहे. तसेच या धडकेमुळे एका मारुती वॅगनार कारलाही मागून फटका बसला. या अपघातात एसटीमधील एका प्रवाशाला गंभीर दुखापत झाली असून, इतर प्रवाशांना किरकोळ मुकामार लागला आहे.
घाटनास्थळी झालेल्या या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली असून, सध्या एकेरी मार्गाने वाहतूक सुरू आहे. यामुळे गोव्याच्या दिशेने जाणारी वाहने अत्यंत धिम्या गतीने पुढे जात आहेत.
मुंबई-गोवा महामार्गावर एसटी बस आणि ट्रकचा भीषण अपघात; एक प्रवासी जखमी
Leave a Comment





