राजापूर विधानसभा क्षेत्रात ठाकरे शिवसैनिकांचा गाव भेट दौरा संपन्न; पदाधिकाऱ्यांनी साधला कार्यकर्त्यांशी थेट संवाद

Gramin Varta
166 Views

तुषार पाचलकर/ राजापूर: पक्षाचे प्रमुख श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार राजापूर विधानसभा क्षेत्रातील तळवडे जिल्हा परिषद गटात नुकताच संघटनात्मक गाव भेट दौरा उत्साहात पार पडला. महिला उप जिल्हा संघटिका तथा चंद्रपूर जिल्हा संपर्क संघटिका सौ. उल्काताई विश्वासराव राजापूर आणि पूर्व विभाग संपर्क प्रमुख सौ. समीक्षाताई सक्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा दौरा पार पडला. या दौऱ्यादरम्यान राजापूर विधानसभा क्षेत्रातील तळवडे जिल्हा परिषद गटांतर्गत येणाऱ्या झर्ये, येरडव, कारवली, पाचल, तळवडे, सावडांव, हातदे, अजिवली, जवलेथर, मिलंद आणि मूर या विविध गावांना भेटी देण्यात आल्या.

या गाव भेट दौऱ्यादरम्यान प्रमुख नेत्यांनी कार्यकर्त्यांशी सवांद साधत पक्षसंघटनेच्या सद्यस्थितीचा आणि SIR संदर्भातील कामाचा सखोल आढावा घेतला. गावागावांत जाऊन पक्षाच्या आगामी भूमिका व संघटनात्मक बांधणीबाबत उपस्थितांशी सविस्तर चर्चा करण्यात आली. या प्रसंगी तळवडे विभागप्रमुख विलासजी नारकर, विभाग संघटिका भामिनी सुतार, विभाग समन्वयक अनंतजी कोलते आणि उपविभाग प्रमुख अप्पा चव्हाण यांच्यासह गावागावांतील प्रमुख पदाधिकारी, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, शाखाप्रमुख, बीएलए आणि शाखा संघटिका मोठ्या संख्येने उपस्थित होते. लोकप्रतिनिधी व वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या या दौऱ्यामुळे स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला.

Total Visitors :
4668281
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *