रत्नागिरी : भाट्ये येथे २ एसटी आणि १ कारचा भीषण अपघात; २२ प्रवासी जखमी

Gramin Varta
1276 Views

रत्नागिरी : भाट्ये येथील झरी विनायक जवळील चढाावावर शनिवारी सकाळी अत्यंत विचित्र आणि गंभीर अपघात घडला. रत्नागिरीहून पावसकडे जाणाऱ्या आणि पावसकडून येणाऱ्या दोन एसटी बसेस झरी विनायक जवळील चढावर समोरासमोर धडकल्या. समोरासमोर आलेल्या या दोन एसटी बसेसच्या धडकेनंतर त्यांच्या मागे असलेली एक कार अनियंत्रित होऊन एसटीवर धडकल्याने हा अपघात झाला. हा अपघात घडत असतानाच, पाठीमागून वेगात येत असलेली एक कार एसटी बसेसवर जाऊन आदळली. त्यामुळे हा अपघात अत्यंत विचित्र स्वरूप धारण करून अधिक गंभीर झाला.

या अपघातात एकूण २२ प्रवासी जखमी झाले असून, बसमधील आणि कारमधील मिळून एकूण २२ प्रवासी जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सर्व जखमी प्रवाशांना तातडीने उपचारासाठी नजीकच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर सध्या वैद्यकीय उपचार सुरू आहेत.

अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली. या भीषण अपघातामुळे रत्नागिरी-पावस मार्गावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली होती. मार्गावर दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. प्रशासनाकडून अपघातग्रस्त वाहने बाजूला सारून वाहतूक सुरळीत करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

- Advertisement -
Total Visitors :
4702699
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *