मजगाव येथे नेत्र तपासणी व एनसीएमसी कार्ड शिबीर संपन्न; ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Gramin Varta
448 Views

रत्नागिरी /सिकंदर फरास: रत्नागिरी तालुक्यातील मजगाव ग्रामपंचायत येथे इन्फिगो आय केअर आणि एहसास ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने मजगाव येथे नुकतेच एक विशेष नेत्र तपासणी शिबीर आणि एसटी बस प्रवासासाठी उपयोगी असणारे एनसीएमसी (NCMC) कार्ड काढण्याचे शिबीर संपन्न झाले. या दोन्ही शिबिरांना परिसरातील ग्रामस्थांकडून मोठा प्रतिसाद मिळाला.

नेत्र तपासणी शिबीरला मजगाव व केळये परिसरातील एकूण ७९ नागरिकांनी लाभ घेतला.तपासणी दरम्यान काही नागरिकांमध्ये डोळ्यांचे आजार किंवा दोष आढळून आले असून त्यांच्यावर महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजने’ अंतर्गत पुढील योग्य उपचार केले जाणार आहेत.

तसेच एनसीएमसी (NCMC) कार्ड शिबीर मध्ये एसटी बस प्रवासासाठी अत्यंत सुलभ ठरणाऱ्या एनसीएमसी कार्ड काढण्याच्या शिबिराचा मजगाव आणि केळये गावातील तब्बल २१७ लाभार्थ्यांनी लाभ घेतला.

ही दोन्ही शिबिरे यशस्वी करण्यासाठी मजगाव ग्रामपंचायतीचे सरपंच/प्रशासक फैयाज मुकादम, ग्रामपंचायत अधिकारी अर्चना कळंबटे,युवासेना उप तालुका प्रमुख संदीप नाखरेकर अंगणवाडी सेविका नफिसा नाखवा, मुज्जू मुकादम, हनीफ पोमेटकर, उमेद अभियानाच्या नूजहत नाकाडे, प्रणय धुळप, समिना मुकादम, मृणाली कदम, एहसास ट्रस्टचे पदाधिकारी व सदस्य, मजगाव ग्रामपंचायत प्रशासकीय सदस्य, तसेच इन्फिगो आय केअरच्या शलाका सावंत, शांताराम बावधने आणि मंगेश पावसकर यांच्यासह मजगाव गावातील ग्रामस्थांचे मोलाचे सहकार्य लाभले.

Total Visitors :
4697917
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *