आवाशी येथे मोफत नेत्रचिकित्सा व योग प्रशिक्षण शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

Gramin Varta
97 Views

संगमेश्वर :  कार्तिकी हेल्थकेअर फाउंडेशन, आवाशी व आवाशी उपकेंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आवाशी ग्रामपंचायत हॉल येथे मोफत नेत्रचिकित्सा, योग प्रशिक्षण व आरोग्य मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला ग्रामस्थ, विद्यार्थी, अंगणवाडीतील बालके तसेच ज्येष्ठ नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

शिबिरामध्ये उपस्थितांची मोफत नेत्र तपासणी करण्यात आली. तसेच योग प्रशिक्षणाच्या माध्यमातून निरोगी जीवनशैली, नियमित व्यायाम व आरोग्याची काळजी याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. आवाशी प्राथमिक शाळेतील विद्यार्थी-विद्यार्थिनी, अंगणवाडीतील बालके आणि वयोवृद्ध नागरिकांनी या उपक्रमाचा मोठ्या संख्येने लाभ घेतला.

कार्तिकी हेल्थकेअर फाउंडेशनचे संचालक डॉ. सागर अनंत जोगळे हे गेल्या दोन-तीन वर्षांपासून आवाशी व पंचक्रोशी परिसरात वैद्यकीय सेवेसोबतच विविध सामाजिक व आरोग्यविषयक उपक्रम राबवत आहेत. ‘वैद्यकीय सेवा हीच सामाजिक बांधिलकी’ या भावनेतून तळागाळातील नागरिकांपर्यंत आरोग्यसेवा पोहोचविण्याचे त्यांचे कार्य कौतुकास्पद आहे.

यावेळी आवाशी उपकेंद्राच्या डॉ. दमयंती कदम यांनी उपस्थितांना आरोग्यविषयक मौलिक मार्गदर्शन केले. शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य तसेच प्राथमिक शाळेतील सर्व शिक्षकवर्ग यांचे मोलाचे सहकार्य लाभले.शिबिर यशस्वी करण्यासाठी संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. राजन सकटे यांनी विशेष परिश्रम घेतले, तर संस्थेचे सचिव अशोक धाडवे यांनी नियोजन व व्यवस्थापनाची जबाबदारी प्रभावीपणे पार पाडली.ग्रामीण भागातील नागरिकांच्या आरोग्याची गरज ओळखून आयोजित करण्यात आलेल्या उपक्रमाला पंचक्रोशीतील ग्रामस्थांचा चांगला प्रतिसाद मिळाला.

Total Visitors :
4697911
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *