लांजा (प्रतिनिधी) : तालुक्यातील आगवे जोशीवाडी येथील २५ वर्षीय तरुण गेल्या २७ जुलैपासून बेपत्ता असल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी लांजा पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली असून, पोलिसांकडून संबंधित तरुणाचा शोध घेण्यात येत आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पंकज प्रकाश जोशी (वय २५, रा. आगवे जोशीवाडी, लांजा) हा २७ जुलै रोजी सकाळी सुमारे ६ वाजण्याच्या सुमारास आपली आई प्रियांका प्रकाश जोशी (वय ५३) हिला बाहेर जाऊन येतो, असे सांगून घरातून निघून गेला. मात्र त्यानंतर तो घरी परतला नाही.
पंकज घरी न परतल्याने त्याची आई तसेच नातेवाईकांनी परिसरात आणि नातेवाईकांकडे त्याचा शोध घेतला. मात्र सर्वत्र शोध घेऊनही त्याचा ठावठिकाणा लागला नाही. अखेर याबाबत संजय विलास चव्हाण (रा. खालची कुंभारवाडी, लांजा) यांनी लांजा पोलीस ठाण्यात पंकज जोशी बेपत्ता झाल्याची फिर्याद दाखल केली आहे.
या घटनेची नोंद झाल्यानंतर लांजा पोलिसांकडून बेपत्ता तरुणाचा शोध घेण्यासाठी आवश्यक तपास सुरू करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल जान्हवी मांजरे करीत आहेत.
दरम्यान, पंकज जोशी याच्याबाबत कोणाला काही माहिती मिळाल्यास तात्काळ लांजा पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. बेपत्ता तरुणाच्या शोधासाठी पोलिसांकडून माहिती संकलित करण्याचे काम सुरू आहे.
लांजा तालुक्यातील २५ वर्षीय तरुण बेपत्ता; आईला सांगून घराबाहेर पडला, मात्र परतलाच नाही
Leave a Comment






