आणीबाणी हा भारतीय लोकशाहीच्या इतिहासातील काळा अध्याय; खेडमध्ये ‘काळा दिवस’ संवाद कार्यक्रम संपन्न

Gramin Varta
118 Views

खेड: २५ जून १९७५ रोजी देशावर लादण्यात आलेल्या आणीबाणीचा काळ हा भारतीय लोकशाहीच्या इतिहासातील एक काळा अध्याय असून, त्या काळात संविधानिक मूल्ये, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि नागरिकांच्या मूलभूत हक्कांची गळचेपी करण्यात आली होती, असे प्रतिपादन प्रमुख वक्ते कर्मवीर पद्मश्री दादासाहेब इदाते यांनी केले. भारतीय जनता पार्टी खेड यांच्या वतीने येथील आय.सी.एस. कॉलेज, खोंडे येथे आयोजित ‘आणीबाणी काळा दिवस’ संवाद कार्यक्रमात ते मार्गदर्शन करत होते.

याप्रसंगी व्यासपीठावर भाजपा नेते तथा खेड नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष ॲड. वैभव खेडेकर, आय.सी.एस. कॉलेजचे चेअरमन ॲड. आनंदराव भोसले, भाजपा अल्पसंख्याक सेलचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष व नगरसेवक गटनेते रहीम भाई सहीबोले, नगरसेविका सौ. वैभवी खेडेकर, भाजपा खेड शहराध्यक्ष भालचंद्र (नंदू) साळवी, तसेच महाविद्यालयाचे विभाग प्रमुख सचिन भोसले व इतर मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमादरम्यान मान्यवरांनी आणीबाणीच्या काळातील संघर्षाची आठवण करून दिली. लोकशाही मूल्यांचे जतन करणे ही काळाची गरज असल्याचे यावेळी उपस्थितांनी नमूद केले. या कार्यक्रमास सौ. अनिता आवटी, भाजपा महिला मोर्चाच्या सौ. प्रीती चिखले, सोशल मीडिया प्रमुख सर्वेश पवार यांच्यासह स्वराज गांधी, ओवेस चौगुले, अनिकेत पवार, प्रसाद मांडवकर, प्रदीप भोसले, डॉ. भालेराव, श्री. केलकर, श्री. सागर यांच्यासह महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *