मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त खेडमध्ये भव्य रक्तदान शिबिर; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Gramin Varta
111 Views

खेड : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पक्ष खेड, बॉम्बे ब्लड ग्रुप ऑर्गनायझर इंडिया, ओ.एच.एच. रेअर ब्लड ग्रुप असोसिएशन ट्रस्ट तासगाव आणि मदत ग्रुप खेड यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. भाजपा नेते तथा खेड नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष ॲड. वैभव खेडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या समाजोपयोगी उपक्रमाला खेड शहर व तालुक्यातील नागरिकांसह युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

खेड शहरातील पोलीस स्टेशनसमोरील पाथारजाई मंदिर सभागृहात पार पडलेल्या या रक्तदान शिबिरात मोठ्या संख्येने रक्तदात्यांनी स्वयंस्फूर्तीने सहभाग नोंदवला. रक्तदान करणाऱ्या प्रत्येक दात्याला स्मार्ट वॉच आणि एअर बड्स भेटवस्तू म्हणून देऊन आयोजकांनी त्यांचा गौरव केला. या उपक्रमामुळे युवकांमध्ये रक्तदानाबाबत जनजागृती होण्यास तसेच गरजू रुग्णांसाठी रक्ताचा साठा उपलब्ध होण्यास मोठी मदत होणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

या शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी भाजपा उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सतीश मोरे, जिल्हा उपाध्यक्ष संजय आखाडे, भाजपा अल्पसंख्याक सेल रत्नागिरी जिल्हाध्यक्ष तथा खेड नगर परिषदेचे नगरसेवक गटनेते रहीम सहीबोले, भाजपा खेड तालुकाध्यक्ष ऋषिकेश मोरे, नगरसेविका स्वप्नाली चव्हाण, भाजपा खेड शहर उपाध्यक्ष शैलेश धारीया, महिला मोर्चा शहर अध्यक्षा आशा सनगरे, महिला मोर्चा शहर उपाध्यक्षा प्रीती चिखले, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष विशाल होळकर, तालुका सरचिटणीस शुभम गायकवाड, उपशहराध्यक्ष प्रणव मापुस्कर यांच्यासह राहुल पाटणे, मंदार आपटे, प्रसाद गांधी, विनायक शिरगावकर, अनिकेत पवार, तुषार पवार, अक्षय सनगरे, राधेश्याम वर्मा, प्रशांत गमरे, शाम तावडे तसेच भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Total Visitors :
4572126
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *