राजापूर : ओणीची परी जड्यार जिल्हास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत ‘बेस्ट फायटर’; सुवर्णपदकावरही नाव

Gramin Varta
155 Views

लांजा/ अरबाज नेवरेकर:-संगमेश्वर तालुका तायक्वांदो अकॅडमी व नगर पंचायत देवरुख तायक्वांदो क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने, रत्नागिरी तायक्वांदो स्पोर्ट्स असोसिएशनच्या मान्यतेखाली आयोजित जिल्हास्तरीय अजिंक्यपद तायक्वांदो क्युरोगी व पुमसे स्पर्धा २०२६ उत्साहात पार पडली.

या स्पर्धेत राजापूर तालुक्यातील ओणी येथील कु. परी संजय जड्यार हिने ज्युनिअर गटातील ४२ किलो वजनी क्युरोगी (फाईट) प्रकारात उत्कृष्ट कामगिरी करत सुवर्णपदक पटकावले. यासोबतच स्पर्धेतील उत्कृष्ट कामगिरीबद्दल तिला ‘बेस्ट फायटर’ हा मानाचाही किताब मिळाला.

परीच्या या यशामागे प्रशिक्षक मुकेश नाचरे, प्रशांत कांबळे, हर्षराज जड्यार, नाचरे मॅडम तसेच सहकारी खेळाडू आणि आई पायल जड्यार यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

परी ही संजय विष्णू जड्यार, महाराष्ट्र नवनिर्माण सेना राजापूर तालुका सचिव, यांची कन्या असून तिच्या या उल्लेखनीय यशाबद्दल क्रीडा क्षेत्रासह विविध स्तरांतून तिचे अभिनंदन व कौतुक होत आहे.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *