लांजा/अरबाज नेवरेकर-होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया लिमिटेडच्या एक्सटेंडेड वॉरंटी (EW) विभागात उल्लेखनीय कामगिरीची नोंद करत रत्नागिरीतील अधिकृत विक्रेते जागृत होंडा यांनी महाराष्ट्रातील टॉप-५ डीलर्समध्ये मानाचे स्थान मिळवले आहे. या यशाची दखल घेत कंपनीतर्फे जागृत होंडाचा विशेष सन्मान करण्यात आला.
कंपनीचे रिजन हेड भूषण देवरे यांच्या हस्ते जागृत होंडाचे व्यवस्थापकीय संचालक राजेंद्र जोशी व रेशमा जोशी यांना सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले.
यावेळी राजेंद्र जोशी यांनी हा सन्मान ग्राहकांनी दाखविलेल्या विश्वासाचा आणि संपूर्ण टीमच्या सातत्यपूर्ण परिश्रमांचा गौरव असल्याचे सांगितले. ग्राहकांना सर्वोत्तम सेवा देण्याची परंपरा यापुढेही कायम ठेवत अधिक गुणवत्तापूर्ण आणि विश्वासार्ह सेवा देण्यासाठी जागृत होंडा कटिबद्ध राहील, असे त्यांनी नमूद केले.
रेशमा जोशी यांनीही ग्राहक, कर्मचारी आणि कंपनीचे आभार व्यक्त करत, हा सन्मान अधिक जोमाने काम करण्याची प्रेरणा देणारा असल्याचे सांगितले. विक्रीबरोबरच विक्रीनंतरच्या सेवेलाही सर्वोच्च प्राधान्य देत ग्राहकांचे समाधान हेच ध्येय राहील, असे त्यांनी स्पष्ट केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सर्व्हिस मॅनेजर निखिल चोगुले यांनी केले, तर सेल्स मॅनेजर अमित शिरधनकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.
जागृत होंडाची एक्सटेंडेड वॉरंटी विभागात उल्लेखनीय कामगिरी; महाराष्ट्रातील टॉप-५ डीलर्समध्ये मानाचे स्थान
Leave a Comment
