कलगी तुरा समाज उन्नती मंडळ मुंबई संस्थेची ५८ वी वार्षिक सभा उत्साहात संपन्न

Gramin Varta
118 Views

मुंबई/ उदय दणदणे: कलगी तुरा लोककला आणि शाहिरी परंपरेचा वारसा जपणारी प्रमुख संस्था ‘कलगी तुरा समाज उन्नती मंडळ मुंबई’ यांची ५८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी १२ जुलै २०२६ रोजी परळ येथील कुणबी समाजोन्नती संघाच्या वाघे हॉलमध्ये पार पडली. संस्थेचे अध्यक्ष सुरेश ऐनारकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेला चिठ्ठीमालक, सभासद आणि शाहिरी क्षेत्रातील मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

सभेची सुरुवात सरचिटणीस संतोष धारशे यांनी उपस्थितांच्या स्वागतपर भाषणाने केली. यानंतर सन २०२५-२६ या कालावधीतील सभेचे मिनिट्स आणि संस्थेचा कार्य अहवाल सहसचिव सुधाकर मास्कर यांनी वाचून दाखविला. त्यानंतर ३१ मार्च २०२६ अखेरचा संस्थेचा ताळेबंद, नफा-तोटा अहवाल आणि कामकाजाचा आर्थिक अहवाल खजिनदार सत्यवान यादव यांनी सादर केला. सभागृहाने या अहवालांना सर्वसंमतीने मंजुरी दिली. सभेत संस्थेची पुढील वाटचाल आणि आगामी काळात हाती घ्यावयाचे विविध उपक्रम यावर सविस्तर चर्चा करण्यात आली असून, या प्रस्तावांनाही उपस्थित सभासदांनी सकारात्मक मान्यता दर्शविली. संस्थेच्या प्रगतीसाठी राबविल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांवर उपस्थितांनी समाधान व्यक्त केले. शेवटी, शाहीरवर्गाचे सहसचिव दिलीप नामे यांनी उपस्थितांचे आभार मानल्यानंतर सभेची अधिकृत सांगता झाली.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *