खेड: दहिवली भूस्खलन दुर्घटनास्थळाची आमदार प्रमोद जठार यांच्यासह भाजप शिष्टमंडळाकडून पाहणी

Gramin Varta
64 Views

खेड : तालुक्यातील दहिवली येथील शेलारवाडी परिसरात अलीकडेच घडलेल्या भूस्खलनाच्या दुर्घटनेची गंभीर दखल घेत आमदार प्रमोद जठार यांनी आज घटनास्थळी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. याप्रसंगी त्यांच्यासोबत भाजपचे ज्येष्ठ नेते तथा खेड नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष ॲड. वैभव खेडेकर आणि भाजप उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सतीश मोरे उपस्थित होते.

आमदार जठार व भाजपच्या अन्य पदाधिकाऱ्यांनी दुर्घटनाग्रस्त भागाची पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच स्थानिक ग्रामस्थांशी संवाद साधून त्यांना प्रशासकीय पातळीवर सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आणि धीर दिला. या संकटकाळात भाजप कार्यकर्त्यांनी स्थानिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे, अशा सूचनाही त्यांनी स्थानिक पदाधिकाऱ्यांना दिल्या.


या पाहणी दौऱ्यात भाजप उत्तर खेड तालुकाध्यक्ष ऋषिकेश मोरे, दक्षिण खेड तालुकाध्यक्ष विनोद चाळके, खेड शहराध्यक्ष भालचंद्र उर्फ नंदू साळवी, भाजप युवा मोर्चा रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस ॲड. मिलिंद उर्फ दादू नांदगावकर, भाजप उत्तर रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस वसंत ताम्हणकर यांच्यासह स्वराज गांधी, ओवैस चौगुले, प्रदीप भोसले आणि दहिवली गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *