पाचल हे आमचे ‘एज्युकेशन हब’, मग शासकीय कामांसाठी तालुक्याला का धावायचे?-अमेय गांधी

Gramin Varta
326 Views

पाचल/ तुषार पाचलकर: पाचल हे पंचक्रोशीतील हजारो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक केंद्र (एज्युकेशन हब) असूनही, स्थानिक तरुणांना व पालकांना विविध शासकीय दाखल्यांसाठी तालुक्याच्या ठिकाणी वारंवार हेलपाटे मारावे लागत आहेत. ही प्रशासकीय ससेहोलपट थांबवण्यासाठी पाचल येथे अप्पर तहसीलदार कार्यालय मंजूर करावे, अशी आग्रही मागणी अमेय उर्फ बंटी गांधी यांनी केली आहे. पाचलमध्ये आधीच राष्ट्रीयीकृत बँका, ई-सेवा केंद्रे आणि उत्तम वाहतूक व्यवस्थेसारख्या पायाभूत सुविधा उपलब्ध आहेत.

तरीही, जात, उत्पन्न, रहिवासी किंवा नॉन-क्रीमी लेयर यांसारख्या अत्यंत महत्त्वाच्या प्रमाणपत्रांसाठी विद्यार्थ्यांना आपला अभ्यासाचा मौल्यवान वेळ आणि पैसा खर्च करून तालुक्याला जावे लागते. जर पाचल येथे अप्पर तहसीलदार कार्यालय सुरू झाले, तर विद्यार्थ्यांची ही कामे शिक्षणासोबतच एकाच ठिकाणी आणि वेळेत पूर्ण होतील. शासनाने केवळ भौगोलिक नकाशा न पाहता तरुण पिढीच्या भविष्याचा आणि वेळेचा विचार करून पाचल येथेच या कार्यालयाचे मुख्यालय मंजूर करावे, अशी ठाम मागणी युवकांकडून करण्यात येत आहे.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *