ब्रेकिंग : निवळी येथे टेम्पोची रिक्षाला जोरदार धडक; वेतोशी येथील रिक्षाचालक गंभीर जखमी

Gramin Varta
462 Views

रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावरील निवळी येथील साई शांती पेट्रोल पंपाजवळ टेम्पोने रिक्षाला जोरदार धडक दिल्याची घटना नुकतीच घडली. या अपघातात रिक्षाचालक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, वेतोशी (ता. रत्नागिरी) येथील रिक्षाचालक साहिल शांती पेट्रोल पंपावर पेट्रोल भरून रत्नागिरीच्या दिशेने जाण्यासाठी रस्ता क्रॉस करत असताना रत्नागिरीहून संगमेश्वरच्या दिशेने जात असलेल्या आयशर टेम्पोने आपल्या रिक्षाला जोरदार धडक दिली. या धडकेत रिक्षाचे मोठे नुकसान झाले असून चालकाच्या डोक्याला व डोळ्याला गंभीर दुखापत झाली आहे.

अपघाताची माहिती मिळताच जगद्गुरू नरेंद्र महाराज संस्थानच्या रुग्णवाहिकेने घटनास्थळी धाव घेत जखमी चालकाला तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालय, रत्नागिरी येथे उपचारासाठी दाखल केले.
या अपघातामुळे काही काळ मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. अपघाताचे नेमके कारण समजू शकले नसून अधिक तपास सुरू आहे.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *