शिष्यवृत्ती परीक्षेत दामले विद्यालयाचे 21 विद्यार्थी गुणवत्ता यादीत चमकले ; वाजत-गाजत रथातून काढली मिरवणूक

Gramin Varta
551 Views

रत्नागिरी : शहरातील नगर परिषद शाळा क्रमांक १५, दामले विद्यालयाने यंदाही आपल्या उज्ज्वल यशाची परंपरा कायम राखत महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या इ. ५ वी व इ. ८ वी शिष्यवृत्ती परीक्षा २०२६ मध्ये तब्बल २१ विद्यार्थी शहरी सर्वसाधारण गुणवत्ता यादीत चमकवले आहेत. विशेष म्हणजे स्पृहा चंद्रशेखर जोशी हिने इयत्ता ५ वी शिष्यवृत्ती गुणवत्ता यादीमध्ये जिल्ह्यात प्रथम तर राज्यात १५ वी क्रमांक मिळवला. या अभिमानास्पद यशानिमित्त दामले विद्यालयातर्फे सर्व यशस्वी विद्यार्थ्यांची वाजत-गाजत रथातून मिरवणूक काढून त्यांचा गौरव करण्यात आला.

इयत्ता ५ वीच्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेच्या शहरी सर्वसाधारण गुणवत्ता यादीत स्पृहा चंद्रशेखर जोशी (जिल्ह्यात प्रथम, राज्यात १५ वी – २७२), हर्षवर्धन सचिन पाटील (जिल्ह्यात १२ वा – २५२), आयुष अनिरुद्ध जोशी (जिल्ह्यात २१ वा – २३८), उमेर वसीम सय्यद (जिल्ह्यात ३५ वा – २२८), दाक्षी उमेश शिंदे (जिल्ह्यात ३६ वी – २२६), ईश्वरी रमाकांत डिंगणे (जिल्ह्यात ६१ वी – २१६), साधना संजय लिंगायत (जिल्ह्यात ६२ वी – २१६), स्वाती गंभिरानंद मदने (जिल्ह्यात ६५ वी – २१४), आराध्या दिपक रानडे (जिल्ह्यात ९८ वी – २०६), स्मित संदीप मांडवकर (जिल्ह्यात ११४ वा – २०४) आणि प्रिती राजेश जाधव (जिल्ह्यात ११७ वी – २०२) यांनी यश संपादन केले. या विद्यार्थ्यांना सौ. श्रद्धा गांगण, श्री. योगेश कदम, श्री. मुकेश पाटील आणि श्री. इरफान शेख यांनी मार्गदर्शन केले.

पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत ओम हरिश्चंद्र वरेकर (जिल्ह्यात ९ वा – २५२), श्रेया सचिन खंदारे (जिल्ह्यात २९ वी – २३०), सई मनोज जोशी (जिल्ह्यात ३५ वी – २२६), सावनी आल्हाद आठलेकर (जिल्ह्यात ४२ वी – २२२), आराध्य देवेंद्र डेंगळे (जिल्ह्यात ४३ वा – २२२), ईशा विशाल चव्हाण (जिल्ह्यात ७५ वी – २०६), राज रमेश कोकरे (जिल्ह्यात ८४ वा – २०२), सिद्धी संदीप स्वामी (जिल्ह्यात ९२ वी – १९६), आसावरी सौरभ अवताडे (जिल्ह्यात ९३ वी – १९६) आणि स्वराज संजय लिंगायत (जिल्ह्यात ९४ वा – १९६) यांनी गुणवत्ता यादीत स्थान मिळवले. या विद्यार्थ्यांना सौ. मंजिरी लिमये, सौ. सिद्धी विचारे, श्री. रवींद्र शिंदे, श्री. अक्षय जोगळेकर आणि श्रीम. ज्योती डंबाळे यांनी मार्गदर्शन केले.

या उल्लेखनीय यशाबद्दल नगराध्यक्ष सौ. शिल्पाताई सुर्वे, प्रशासन अधिकारी प्रा. श्री. सुधाकर मुरकुटे, व्यवस्थापन समिती अध्यक्ष मिलिंद संसारे तसेच मुख्याध्यापक श्री. भगवान मोटे यांनी सर्व गुणवंत विद्यार्थी, पालक आणि मार्गदर्शक शिक्षकांचे विशेष अभिनंदन केले.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *