GRAMIN SEARCH BANNER

राष्ट्रीय योगासन स्पर्धेत पूर्वा किनरेची शानदार कामगिरी; १ सुवर्ण आणि २ रौप्य पदके पटकावली

Gramin Varta
237 Views

रत्नागिरी: छत्तीसगडच्या भिलाई दुर्ग येथे नुकत्याच झालेल्या सहाव्या राष्ट्रीय योगासन स्पर्धेत रत्नागिरीच्या पूर्वा किनरे हिने १ सुवर्ण आणि २ रौप्य पदके पटकावून जिल्ह्याचे नाव उंचावले आहे. या स्पर्धेत देशभरातील ३६ राज्यांमधून ४५० खेळाडू सहभागी झाले होते.
१० ते १४ सप्टेंबर या कालावधीत पार पडलेल्या या स्पर्धेत पूर्वाच्या उत्कृष्ट कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

तिच्या या यशाचे श्रेय ती आपले प्रशिक्षक रवीभूषण कूमठेकर यांना देते. कोल्हापूर येथे कार्यरत असलेले रवीभूषण पुंमठेकर यांच्या मोलाच्या मार्गदर्शनामुळेच हे यश संपादन करता आले, असे पूर्वाने सांगितले.पूर्वाच्या या चमकदार कामगिरीबद्दल सर्व स्तरातून तिचे अभिनंदन होत आहे.

Total Visitor Counter

3376396
Share This Article