पाली : जि.प.पुर्ण प्राथमिक आदर्श विद्यामंदिर शाळा पाली क्र.१ मध्ये आज उत्साहात सरस्वती पूजन संपन्न झाले. यावेळी उपस्थित विद्यार्थी व शिक्षक, पालकांनी सरस्वती प्रतिमेचे पुष्पांजली अर्पण करून पूजन केले त्यानंतर विद्यार्थ्यांनी आपल्या पाटीवर व वहीत सरस्वती प्रतिमेचे चित्र रेखाटन केले व सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.
या कार्यक्रमाला शाळेचे मुख्याध्यापक जनार्दन मोहिते,उपशिक्षक ममता सावंत,मारुती घोरपडे,श्रद्धा रसाळ,श्रुती वारंग,प्रमिला मावळणकर,शा.व्य.समितीचे अध्यक्ष उमेश शिंदे,उपसरपंच संतोष धाडवे,ग्रामविकास अधिकारी आशिष खोचाडे,
विद्यार्थी सुरक्षा समितीचे अॅड.सागर पाखरे,प्रार्थना ठीक,स्नेहा शिंदे व पालक उपस्थित होते.
पाली शाळेत सरस्वती पूजन
